विरूद्धार्थी शब्द MCQ Quiz in বাংলা - Objective Question with Answer for विरूद्धार्थी शब्द - বিনামূল্যে ডাউনলোড করুন [PDF]
Last updated on Mar 23, 2025
Latest विरूद्धार्थी शब्द MCQ Objective Questions
Top विरूद्धार्थी शब्द MCQ Objective Questions
विरूद्धार्थी शब्द Question 1:
हीन या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?
Answer (Detailed Solution Below)
विरूद्धार्थी शब्द Question 1 Detailed Solution
हीन या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द दर्जेदार हा होईल.
Additional Informationविरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
गरीब या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द श्रीमंत हा होईल.
दीन या शब्दाचा अर्थ गरीब असा होतो त्यामुळे दीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द श्रीमंत हाच होईल पण दिन या शब्दाचा अर्थ दिवस असा होतो त्यामुळे दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रात्र हा होईल.
लीन या शब्दाचा अर्थ मग्न,गर्क किंवा तल्लीन असा होतो.
विरूद्धार्थी शब्द Question 2:
आवक - या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?
Answer (Detailed Solution Below)
विरूद्धार्थी शब्द Question 2 Detailed Solution
आवक या शब्दाला जमा,मिळकत हे शब्द समानार्थी ठरतात.
इतर पर्याय आणि त्यांचे विरुद्धार्थी शब्द
- सुसंगत × विसंगत
- आयात × निर्यात
- सुगम × दुर्गम
विरूद्धार्थी शब्द Question 3:
कुचकामी - या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
विरूद्धार्थी शब्द Question 3 Detailed Solution
उत्तर:-कुचकामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द फलदायी हा आहे
Important Points विरुद्धार्थी शब्द व्याख्या :- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.
कुचकामी या शब्दाला निरुपयोगी,त्याज्य,निष्फळ शब्द समानार्थी ठरतात.
विरूद्धार्थी शब्द Question 4:
वात्रट - या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
विरूद्धार्थी शब्द Question 4 Detailed Solution
- एखाद्या विशिष्ट शब्दाचा विरुद्ध अर्थ प्रकट करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या विशिष्ट शब्दाचा 'विरुद्धार्थी शब्द' असे म्हणतात.
- उदा. वात्रट × सद्गुणी
- मराठी भाषेत अनेक शब्दांना 'अ' किंवा 'नि' किंवा 'उ' हे उपसर्ग लावून उलट अर्थाचे शब्द बनवता येतात, हे खरे आहे. परंतु नेहमीच तसे घडत नाही.
- उदा. 'मर्यादित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बऱ्याच वेळा 'अमर्यादित' असा दिलेला आढळतो. पण तो चुकीचा आहे. त्याऐवजी 'अमर्याद' हा शब्द योग्य आहे.
-
तसेच 'सीमित' या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द 'असीमित' नसून 'असीम' असा आहे. त्यामुळे विरुद्धार्थी शब्द वापरताना त्यांचा नेमका अर्थ माहीत असणे अपेक्षित आहे.
- हुशार × मठ्ठ
- शांत × अशांत
- रागीट × प्रेमळ
विरूद्धार्थी शब्द Question 5:
रणशूर - या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
विरूद्धार्थी शब्द Question 5 Detailed Solution
रणशूर या शब्दाला रणवीर,पराक्रमी हे शब्द समानार्थी ठरतात.
इतर पर्याय आणि त्यांचे विरुद्धार्थी शब्द
- पराक्रमी × पळपुटा
- भित्रा × धीट
- रणविर × रणभीरू
विरूद्धार्थी शब्द Question 6:
'विसंवाद' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द सांगा.
Answer (Detailed Solution Below)
विरूद्धार्थी शब्द Question 6 Detailed Solution
विरुद्धार्थी शब्द-
- विरुद्धार्थी शब्द हे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द असतात.
- मराठी भाषेत अनेक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरले जातात.
- विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत antonyms किंवा opposites words म्हटले जाते.
'विसंवाद' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द सुसंवाद हा आहे.
विरूद्धार्थी शब्द Question 7:
‘शाश्वत’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
Answer (Detailed Solution Below)
विरूद्धार्थी शब्द Question 7 Detailed Solution
विरुद्धार्थी शब्द : एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय.
वरील ‘शाश्वत’ या शब्दाचा अर्थ कायमपणा,टिकाऊपणा,शाश्वती असा होतो.
शाश्वत’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अल्पकाळ असा होतो. बाकी सर्व पर्याय समानर्थी शब्द आहेत.
शाश्वत’×अल्पकाळ
अशा प्रकारे वरील अल्पकाळ हा योग्य पर्याय आहे.
विरूद्धार्थी शब्द Question 8:
माजी - या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
विरूद्धार्थी शब्द Question 8 Detailed Solution
माजी या शब्दाला भूतपूर्व हा शब्द समानार्थी ठरतो.
इतर पर्याय आणि त्यांचे विरुद्धार्थी शब्द
- प्रतिगामी × पुरोगामी
- जिवंत × मृत
- पुरोगामी × प्रतिगामी
विरूद्धार्थी शब्द Question 9:
'उताणा' या शब्दाचा पुढील पैकी विरूध्दार्थी शब्द कोणता?
Answer (Detailed Solution Below)
विरूद्धार्थी शब्द Question 9 Detailed Solution
उत्तर - उताणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पालथा हा होईल.
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
सरळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तिरपा किंवा वक्र होईल.
विरूद्धार्थी शब्द Question 10:
'रसिक श्रोते दाद देत असतील तर कलाकाराचा उत्साह द्विगुणित होतो.' - अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
विरूद्धार्थी शब्द Question 10 Detailed Solution
उत्तर - रसिक या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द अरसिक हा होईल.
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
Additional Information
- आस्तिक या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द नास्तिक हा होईल.
- कोडगा या शब्दाचा अर्थ बेशरम किंवा निर्ल्लज असा होतो याचा विरूध्दार्थी शब्द संकोची किंवा अभिमानी हा होईल.