शब्द MCQ Quiz in বাংলা - Objective Question with Answer for शब्द - বিনামূল্যে ডাউনলোড করুন [PDF]

Last updated on Mar 25, 2025

পাওয়া शब्द उत्तरे आणि तपशीलवार उपायांसह एकाधिक निवड प्रश्न (MCQ क्विझ). এই বিনামূল্যে ডাউনলোড করুন शब्द MCQ কুইজ পিডিএফ এবং আপনার আসন্ন পরীক্ষার জন্য প্রস্তুত করুন যেমন ব্যাঙ্কিং, এসএসসি, রেলওয়ে, ইউপিএসসি, রাজ্য পিএসসি।

Latest शब्द MCQ Objective Questions

Top शब्द MCQ Objective Questions

शब्द Question 1:

'स्तुती गाणारा' या अर्थासाठी योग्य तो शब्द निवडा.

  1. गायक
  2. कलाकार
  3. स्तुतीगायक
  4. भाट

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : भाट

शब्द Question 1 Detailed Solution

स्पष्टीकरण- 

मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. या भाषेत अनेक असे शब्द आहेत जे अतिशय लहान असूनही त्यातून मोठा अर्थ सूचित होतो. जसे की अनेक शब्दांबद्दल एक शब्द. या प्रकारात अनेक शब्द बोलायची गरज नसते. एकाच शब्दातून सर्व भाव प्रकट होऊन जातात.
उदा. कमी वेळ टिकणारा- क्षणभंगुर

अशाचप्रकारे स्तुती गाणारा या अर्थासाठी भाट हा शब्द योग्य आहे. 

शब्द Question 2:

'राज्यातील लोक' यासाठी योग्य पर्याय निवडा.

  1. प्रजाजन
  2. रयत
  3. प्रजा
  4. वरीलपैकी सर्व

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : वरीलपैकी सर्व

शब्द Question 2 Detailed Solution

स्पष्टीकरण-

मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. या भाषेत अनेक असे शब्द आहेत जे अतिशय लहान असूनही त्यातून मोठा अर्थ सूचित होतो. जसे की अनेक शब्दांबद्दल एक शब्द. या प्रकारात अनेक शब्द बोलायची गरज नसते. एकाच शब्दातून सर्व भाव प्रकट होऊन जातात.
उदा. कमी वेळ टिकणारा- क्षणभंगुर

अशाप्रकारे राज्यातील लोक यासाठी प्रजाजन, प्रजा, रयत, जनता अशी बरीच नावे आहेत. वरील पर्यायांपैकी सर्व पर्याय हे योग्य आहेत.

शब्द Question 3:

'अनिष्ट' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

  1. अशुभ
  2. शुभ
  3. कल्याणकारी
  4. चांगला

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : अशुभ

शब्द Question 3 Detailed Solution

उत्तर - अनिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द अशुभ हा होईल.

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.

कल्याणकारी, चांगला हे शुभ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

शब्द Question 4:

सुज्ञ - या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.

  1. तज्ञ
  2. अज्ञान
  3. अफाट
  4. अज्ञ

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : अज्ञ

शब्द Question 4 Detailed Solution

उत्तर:-  सुज्ञ या  शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अज्ञ हा आहे. 

Important Pointsविरुद्धार्थी शब्द:- एखाद्या शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.
सुज्ञ या शब्दाला विद्वान,जाणता,समंजस हे शब्द समानार्थी ठरतात.
इतर पर्याय आणि त्यांचे विरुद्धार्थी शब्द-

  • तज्ञ ×अकुशल,अननुभवी 
  • अज्ञान × ज्ञान 
  • अडाणी× साक्षर,सुशिक्षित

शब्द Question 5:

'लयलूट' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

  1. चणचण
  2. रेलचेल
  3. लुटलेले
  4. कमतरता

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : रेलचेल

शब्द Question 5 Detailed Solution

उत्तर - लयलूट या शब्दाचा समानार्थी शब्द रेलचेल हा होईल.

लयलूट या शब्दाचा अर्थ भरमसाटपणा किंवा विपुलता असा होतो.

Additional Informationसमानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.

चणचण या शब्दाचा समानार्थी शब्द कमतरता हा होईल.

लुटलेले म्हणजे लुटून किंवा लबाडीने किंवा कपटीपणाने मिळवलेली संपत्ती होय. 

शब्द Question 6:

'नवकोट नारायण' या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

  1. कळ लावणारा
  2. अतिशय श्रीमंत
  3. ढोंगी मनुष्य
  4. उदार माणूस

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : अतिशय श्रीमंत

शब्द Question 6 Detailed Solution

आलंकारिक शब्द:

  • मराठी भाषेची गोडी ही अवीट आहे. असंख्य शब्दरूप या भाषेत वसलेले आहेत. मराठी भाषेतील शब्दसंपदा अफाट आहे आणि हेच ह्या भाषेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
  • मराठी भाषेत एखादी भावना आहे ती त्या शब्दाने न सांगता त्यासाठी विशिष्ट रचनात्मक शब्दांचा वापर केला जातो त्यास आलंकारिक शब्द असे म्हणतात.

 

'नवकोट नारायण' या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ 'अतिशय श्रीमंत' असा होतो.

Additional Informationअन्य पर्यायांचे स्पष्टीकरण-

  1. कळ लावणारा- कळीचा नारद
  2. ढोंगी मनुष्य- बोकेसंन्यासी
  3. उदार माणूस- कर्णाचा अवतार

शब्द Question 7:

खालीलपैकी कोणते भाववाचक नाम आहे?

  1. लक्ष्मी
  2. शहर
  3. नम्रता
  4. गोदावरी

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : नम्रता

शब्द Question 7 Detailed Solution

नामाचे मुख्य ३ प्रकार पडतात.

  1. सामान्यनाम
  2. विशेषनाम
  3. भाववाचक नाम

भाववाचक नाम- ज्या शब्दाने प्राणी वा व्यक्ती, अथवा वस्तूच्या गुण,धर्म, किंवा भाव याचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात.
उदा. सौंदर्य, धैर्य,उंची,गोडी,वात्सल्य, नम्रता इ. 

अशाप्रकारे प्रस्तुत पर्यायांपैकी नम्रता हे भाववाचक नाम आहे.

Additional Informationसामान्यनाम - एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या पदार्थाला दिले जाणारे सर्वसामान्य नाम म्हणजे सामान्यनाम. 
उदा. मुलगी, पुस्तक, झाड, शहर, नदी, कुत्रा, इ. 

विशेषनाम- ज्या नामामुळे विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, किंवा प्राण्याचा बोध होतो, त्यास विशेषनाम म्हणतात. 
उदा. राम, कमळ, भरत, लक्ष्मी, गोदावरी, सोनू इ. 

शब्द Question 8:

प्रस्तुत पर्यायांपैकी 'हत्ती' या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा.

  1. द्विरद 
  2. हस्ती
  3. पीलू
  4. वैनतेय

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : वैनतेय

शब्द Question 8 Detailed Solution

समानार्थी शब्द-

  • एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
  • मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. 
  • सम + अर्थी(समान अर्थी) अशी जेव्हा शब्दाची फोड होते तेव्हा आपल्याला समानार्थी शब्द समजायला अधिक सोपे जाते.

स्पष्टीकरण-

  • द्विरद, हस्ती आणि पीलू ही हत्तीचीच समानार्थी शब्दे आहेत.
  • वैनतेय ह्याचा अर्थ गरुड असा होतो.

 

प्रस्तुत पर्यायांपैकी 'हत्ती' या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द वैनतेय हा आहे.

शब्द Question 9:

चंचल शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. स्थिर
  2. अवखळ
  3. अल्लड
  4. पाखरू

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : स्थिर

शब्द Question 9 Detailed Solution

विरुद्धार्थी शब्द- 

  • विरुद्धार्थी शब्द हे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द असतात.
  • मराठी भाषेत अनेक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरले जातात.
  • विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत antonyms किंवा opposites words म्हटले जाते.

 

चंचल शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द स्थिर हा होईल.

अवखळ व अल्लड हे चंचल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

शब्द Question 10:

नामाची संख्या दर्शविणारे विशेषण म्हणजे – 

  1. संख्या विशेषण 
  2. सार्वनामिक विशेषण
  3. गुण विशेषण
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : संख्या विशेषण 

शब्द Question 10 Detailed Solution

विशेषण-

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. 

विशेषण हे नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करते. 

उदा- शुभ्र वस्त्र, मोहक नयन, आर्त आवाज, भारदस्त देह ह्या सर्व शब्दांत आलेल्या नामाबद्दल त्यासोबतचा शब्द विशेष माहिती सांगत आहे. 

संख्या विशेषणे - नामाची संख्या दर्शविणारे विशेषण म्हणजे संख्या विशेषण होय.

उदा. हजार रुपये, पाच फळे, चौपट रक्कम इ. 

अशाप्रकारे नामाची संख्या दर्शविणारे विशेषण म्हणजे संख्या विशेषण होय.

Get Free Access Now
Hot Links: teen patti customer care number teen patti teen patti gold apk teen patti royal - 3 patti