समूहदर्शक शब्द MCQ Quiz in বাংলা - Objective Question with Answer for समूहदर्शक शब्द - বিনামূল্যে ডাউনলোড করুন [PDF]
Last updated on Mar 21, 2025
Latest समूहदर्शक शब्द MCQ Objective Questions
Top समूहदर्शक शब्द MCQ Objective Questions
समूहदर्शक शब्द Question 1:
चुकीची जोडी निवडा.
Answer (Detailed Solution Below)
समूहदर्शक शब्द Question 1 Detailed Solution
आलंकारिक शब्द म्हणजे काय - ज्याप्रमाणे अलंकार, पोशाख, केशरचना या मानवाच्या सौंदर्यात भर घालतात; तसेच म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात. सर्व भाषामध्ये यांचा वापर केला जातो. कमी शब्दामध्ये व्यापक अर्थ अलंकारिक शब्दातून सांगितला जातो. आलंकारिक शब्दाचा शाब्दिक अर्थ लक्षात न घेता त्यामागील भावार्थ समजून घेणे आवश्यक असते. म्हणून आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. आलंकारिक शब्दांचा अर्थ माहित नसेल तर त्यातून चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो.
वरील दिलेल्या जोड्यांमध्ये अलंकारिक शब्द व त्याचे अर्थ अश्या जोड्या दिल्या आहेत.
वरील खडाजंगी- अतिशय तापट ही जोडी चुकीची आहे कारण खडाजंगी याचा अर्थ जोरदार मोठे भांडण असा होतो किंवा जोराचे भांडण असा होतो.व वरील बाकी सर्व लंकारिक शब्द व अर्थाच्या जोड्या योग्य आहेत.
अशा प्रकारे वरील खडाजंगी- अतिशय तापट ही चुकीची जोडी आहे.
समूहदर्शक शब्द Question 2:
खाली दिलेल्या शब्दांसाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.
उपकारासाठी ओशाळ बनलेला
Answer (Detailed Solution Below)
समूहदर्शक शब्द Question 2 Detailed Solution
समूहदर्शक शब्द- भावना व्यक्त करण्यासाठी अनेक शब्दांचा वापर न करता त्यासाठी एकच शब्द वापरला जातो त्यास समूहदर्शक शब्द असे म्हणतात.
उपकारासाठी ओशाळ बनलेला या शब्दसमूहासाठी मिंधा हा शब्द योग्य आहे.
उदा- मोहनच्या उपचाराचे पैसे रमेश ने भरल्याने मोहन रमेश चा मिंधा झाला.
अन्य पर्यायांचे स्पष्टीकरण-
- बेवारस- ज्याला कोणी मालक नाही असा
- मंद- डोक्याने कमी असलेला
- आश्रित- दुसऱ्यांचा आश्रय घेऊन राहणारा
समूहदर्शक शब्द Question 3:
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
काजूंची असते______.
Answer (Detailed Solution Below)
समूहदर्शक शब्द Question 3 Detailed Solution
समूहदर्शक शब्द- समूहदर्शक शब्द म्हणजे एखाद्या वस्तूंचा किंवा गोष्टींच्या एकत्रित गटाला दिलेली उपमा होय.
काजूंची असते ती ___ यासाठी प्रस्तुत पर्यायांपैकी गाथण हा योग्य पर्याय आहे. Additional Information
अन्य पर्यायांचे स्पष्टीकरण-
- सैनिकांची- तुकडी
- नाण्यांची- चळत
- दुर्वांची- जुडी
समूहदर्शक शब्द Question 4:
चुकीची जोडी ओळखा
Answer (Detailed Solution Below)
समूहदर्शक शब्द Question 4 Detailed Solution
- बोलत असताना काहीवेळा आपण अनेकवचनासाठी काही विशिष्ट शब्द वापरतो त्यांना 'समूहदर्शक शब्द' असे म्हणतात.
- धान्याच्या मोठ्या ढिगास आपण 'रास' असे म्हणतो. तर भाकऱ्या किंवा रुपयांच्या ढिगास आपण 'चवड' असे म्हणतो. म्हणून 'धान्याची चवड' ही जोडी चुकीची आहे.
- आंब्यांच्या झाडांची - राई
- प्रश्न पत्रिकांचा- संच
- उंटांचा, लमाणांचा- तांडा
- पालेभाजीची- गड्डी/जुडी
- नोटांची, पोत्यांची- थप्पी
- करवंदांची- जाळी
- जहाजांचा- काफिला
- माणसांचा- जमाव
- बांबूचे- बेट
समूहदर्शक शब्द Question 5:
स्वतःशी केलेले भाषण
Answer (Detailed Solution Below)
समूहदर्शक शब्द Question 5 Detailed Solution
उत्तर - स्वतःशी केलेले भाषण म्हणजे स्वगत होय.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय.
Additional Informationसंभाषण म्हणजे एकापेक्षा अधिक माणसांचे आपसातील बोलणे होय.
सुभाषित म्हणजे बोधपर वचन होय.
एखादी गोष्ट संपण्याची क्रिया म्हणजे समारोप होय.
समूहदर्शक शब्द Question 6:
स्वतःच्या फायद्याचे पाहणारा-
- स्वार्थपरायण
- अप्पलपोटा
- घरभेदी
- कळलावू
Answer (Detailed Solution Below)
समूहदर्शक शब्द Question 6 Detailed Solution
समूहदर्शक शब्द - भावना व्यक्त करण्यासाठी अनेक शब्दांचा वापर न करता त्यासाठी एकच शब्द वापरला जातो त्यास समूहदर्शक शब्द असे म्हणतात.
स्वतःच्या फायद्याचे पाहणारा यासाठी स्वार्थपरायण आणि अप्पलपोटा हे दोन्हीही शब्द योग्य आहेत.
अशाप्रकारे पर्याय क्र. 1 आणि 2 बरोबर आहेत.
समूहदर्शक शब्द Question 7:
दु:खाने सोडलेला लांब श्वास यासाठी शब्द सांगा.
Answer (Detailed Solution Below)
समूहदर्शक शब्द Question 7 Detailed Solution
समूहदर्शक शब्द-
अनेक शब्दांऐवजी एक शब्द वापरून वाक्याला अर्थपूर्ण बनविता येते.
उगाच पाल्हाळ न लावता एका शब्दात त्या अर्थाची महती आपल्यापर्यंत पोहोचते.
दु:खाने सोडलेला लांब श्वास यासाठी सुस्कारा हा शब्द योग्य आहे.
समूहदर्शक शब्द Question 8:
नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत - यासाठी पर्यांयी शब्द निवडा.
Answer (Detailed Solution Below)
समूहदर्शक शब्द Question 8 Detailed Solution
शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय.
नांदी - नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत.
नांदी म्हणजे - एखादे कार्य वा गोष्ट सुरू होण्याची क्रिया,किंवा आरंभ ,प्रारंभ,सुरुवात.
वरील दिलेल्याप्रमाणे नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत या साठी योग्य शब्दसमूह नांदी हा आहे.
अशा प्रकारे वरील नांदी हा योग्य पर्याय आहे.
समूहदर्शक शब्द Question 9:
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
शोकाचे वर्णन करणारी कविता
Answer (Detailed Solution Below)
समूहदर्शक शब्द Question 9 Detailed Solution
उत्तर - शोकाचे वर्णन करणारी कविता म्हणजे विलापिका होय.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय.
Additional Informationशोकांतिका हा कथा, नाटक, चित्रपट, इ.चा एक प्रकार आहे. यात कथानकाचा अंत दुःखद होतो.
हृदयद्रावक म्हणजे अंतःकरणाला पाझर फोडणारे होय.
विडंबन म्हणजे दोषांवर विनोदी पद्धतीने केलेली टीका होय.
समूहदर्शक शब्द Question 10:
खालील शब्दांपैकी 'नावेतून करण्याची जलक्रीडा' या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता?
Answer (Detailed Solution Below)
समूहदर्शक शब्द Question 10 Detailed Solution
शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय.
नौका-विहार - 'नावेतून करण्याची जलक्रीडा'
नौका- विहार म्हणजे मनोरंजन किंवा प्रतियोगिता म्हणून नौकेतून केला जाणारा प्रवास.
वरील दिलेल्या प्रमाणे नावेतून करण्याची जलक्रीडा' या शब्दसमूहासाठी नौका-विहार हा योग्य शब्द आहे.
अशा प्रकारे वरील नौका-विहार हा योग्य पर्याय आहे.