Question
Download Solution PDF'व्यर्थ' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFसमास म्हणजे शब्दांचे एकत्रीकरण करून जोडशब्द तयार करणे होय.
समासामध्ये कमीतकमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात.
समासाचे खालील प्रमाणे प्रकार पडतात.
- अव्ययीभाव
- द्वंद्व
- बहुव्रीही
- तत्पुरुष
Important Points
अव्ययीभाव : या समासामध्ये पहिले पद हे प्रमुख असून ते उपसर्गरूपी असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो हे उपसर्ग संस्कृत ,मराठी फारशी भाषेतील असतात तसेच हे शब्द बहुधा स्थळ /काळ /रीतिवाचक असतात.
उदा.आजन्म - जन्मापासून
व्यर्थ - अर्थाशिवाय (रीतिवाचक )
अशा प्रकारे व्यर्थ हा अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे.
Additional Information
तत्पुरुष : या समासामध्ये दुसरे पद हे प्रमुख असते. उदा.ग्रंथकार - ग्रंथ करणारा
द्वंद्व : या समासामध्ये दोन्ही पदे हि प्रमुख असतात. उदा.स्त्रीपुरुष - स्त्री आणि पुरुष
बहुव्रीही : या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून या दोघांशिवाय तिसर्याच पदाचा बोध होतो. उदा. नीळकंठ - निळा आहे कंठ ज्याचा असा तो ( शंकर)
Last updated on Jun 14, 2024
-> Maharashtra Police will soon release the notification for 1000 Maharashtra Police Constables for the year 2025.
->A Maharashtra Police Constable's monthly salary is around ₹29,000 to ₹34,000.
-> The Maharashtra Police Constable selection process will begin with a Physical Test, followed by a written examination.
-> The candidates must check the Maharashtra Police Constable Previous Years’ Paper to be aware of the questions asked in the examination.