विधेय विभाग MCQ Quiz in தமிழ் - Objective Question with Answer for विधेय विभाग - இலவச PDF ஐப் பதிவிறக்கவும்
Last updated on Mar 29, 2025
Latest विधेय विभाग MCQ Objective Questions
Top विधेय विभाग MCQ Objective Questions
विधेय विभाग Question 1:
रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच _______ असते त्यास केवल वाक्य म्हणतात.
Answer (Detailed Solution Below)
विधेय विभाग Question 1 Detailed Solution
उत्तर: पर्याय १ विधेय
ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य म्हणतात.
Important Pointsवाक्याचे तीन प्रकार मानले गेले आहेत. हे वर्गीकरण त्या वाक्यातील विधानांच्या संख्येवर अवलंबून असते.
- केवल वाक्य
- मिश्रवाक्य
- संयुक्त वाक्य
Additional Information
- केवल वाक्य: या प्रकारच्या वाक्यांमध्ये एकच विधान किंवा एकच उद्येश्य असतो. उदा.: मी पुस्तक लिहिले.
- मिश्र वाक्य: अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये एक प्रधानवाक्य असते व दुसरे वाक्य एक किंवा एकापेक्षा अधिक गौण वाक्ये असतात. (गौण वाक्ये प्रधान वाक्यावर अवलंबून असतात.) ही वाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. उदा.: माणसाचे विचार बदलले की त्याचे आयुष्य बदलू लागते.
- संयुक्त वाक्य: दोन अर्थपूर्ण किंवा स्वतंत्र वाक्ये जर प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असतील तर त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा.: मी दुपारी काम करते किंवा मुलीचा अभ्यास घेते.
अशा प्रकारे पर्याय १ विधेय हा योग्य शब्द आहे.
विधेय विभाग Question 2:
'त्याने हे पुस्तक लिहिले.' या वाक्यातील कर्म ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
विधेय विभाग Question 2 Detailed Solution
कर्म - क्रिया ज्यावर घडते त्याला कर्म म्हणतात.
कर्ता - क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात.
क्रियापद - वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.
Important Pointsक्रिया कोणावर घडते? या प्रश्नांचे उत्तर म्हणजे कर्म असते.
क्रिया कोण करतो? या प्रश्नांचे उत्तर म्हणजे कर्ता असतो.
लिहण्याची क्रिया कोणावर झाली?
- पुस्तकावर
या ठिकाणी क्रिया पुस्तकावर घडते म्हणून पुस्तक कर्म होईल.
लिहणारे कोण?
-तो/त्याने
म्हणून तो/त्याने हा कर्ता होईल.
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द - लिहले
म्हणून लिहले हे क्रियापद होईल.
विधेय विभाग Question 3:
सीता पुस्तक वाचते' या वाक्यात पुस्तक काय आहे?
Answer (Detailed Solution Below)
विधेय विभाग Question 3 Detailed Solution
कर्म : जो शब्द वाक्यात झालेली क्रिया दर्शवित असतो त्याला कर्म असे म्हणतात.
कर्ता : वाक्यात क्रिया करणारा करता असतो.तसेच वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला कर्ता असे म्हणतात.
क्रियापद : वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
विशेषण :नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्त्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात.
वरील दिलेल्या सीता पुस्तक वाचते' या वाक्यात पुस्तक हे कर्म आहे व सीता कर्ता व वाचते हे क्रियापद आहे.
अशा प्रकारे वरील दिलेल्या वाक्यात पुस्तक हे कर्म आहे.
विधेय विभाग Question 4:
कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल तर त्याला _______.
Answer (Detailed Solution Below)
विधेय विभाग Question 4 Detailed Solution
उत्तर- कर्मपूरकाचा विस्तार म्हणतात
Important Pointsकर्मपूरकाचा विस्तार- कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल तर तो शब्द कर्मविस्तार किंवा कर्मपूरकाचा विस्तार असतो.
कर्माची अधिविशेषणे कर्मपूरकाच्या विस्ताराचे कार्य करतात.
उदा- शेजारचा मधु खूप तन्मयतेने गोष्टींचे पुस्तक वाचतो.
Additional Informationवाक्याचे खालील दोन विभाग पडतात.
- उद्देश विभाग
- विधेय विभाग
उद्देश विभाग -
उद्देश (कर्ता) - वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो.
उद्देश विस्तार - कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील तर अशा शब्दांना उद्देश विस्तार म्हणतात.
विधेय विभाग/विधेयांग -
कर्म - वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते म्हणजेच क्रिया सोसणारे कर्म असते.
कर्म विस्तार - कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे कर्म विस्तार होय.
विधान पूरक - कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यांनंतर आला तर ते विधानपूरक असते.
विधेय विस्तार - वाक्यात क्रियापदाविषयी माहिती सांगणार्या शब्दांचा यात समावेश होतो. क्रियापदाला केव्हा/ कोठे/ कसे ने प्रश्न विचारल्यास विधेय विस्तार उत्तर येते. ही सर्व क्रियाविशेषणे असतात.
विधेय - क्रियापदास विधेय असे म्हणतात.