लिंग MCQ Quiz in தமிழ் - Objective Question with Answer for लिंग - இலவச PDF ஐப் பதிவிறக்கவும்

Last updated on Apr 1, 2025

பெறு लिंग பதில்கள் மற்றும் விரிவான தீர்வுகளுடன் கூடிய பல தேர்வு கேள்விகள் (MCQ வினாடிவினா). இவற்றை இலவசமாகப் பதிவிறக்கவும் लिंग MCQ வினாடி வினா Pdf மற்றும் வங்கி, SSC, ரயில்வே, UPSC, மாநில PSC போன்ற உங்களின் வரவிருக்கும் தேர்வுகளுக்குத் தயாராகுங்கள்.

Latest लिंग MCQ Objective Questions

Top लिंग MCQ Objective Questions

लिंग Question 1:

पुढील शब्दाचे लिंग ओळखा.

वेळ

  1. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुसकलिंग
  4. उभयलिंग

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : पुल्लिंग आणि स्त्रीलिंग

लिंग Question 1 Detailed Solution

उत्तर - वेळ हा शब्द पुल्लिंग आणि स्त्रींलिंग अशा दोन्ही लिंगात आढळतो म्हणून पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे योग्य उत्तर होईल.

Important Pointsलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.

लिंग हे तीन प्रकारचे आहे.

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुंसकलिंग

पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात. 

उदा. मुलगा, घोडा, फळा, भाला, सदरा इ.

स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. 

उदा. मुलगी, टोपली, घोडी, फळी, काठी, साडी इ.

नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.

उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.

लिंग Question 2:

पुढील शब्दाचे लिंग ओळखा.

नाव

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुसकलिंग
  4. उभयलिंग

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : उभयलिंग

लिंग Question 2 Detailed Solution

उत्तरउभयलिंग

लिंग नामावरून एखादी व्यक्ती किंवा वस्तू ही पुरुष जातीची किंवा स्त्री जातीची आहे की या दोन्हीपैकी कुठल्याही जातीची नाही हे कळते त्यालाच लिंग असे म्हणतात.

लिंगाचे मुख्य तीन प्रकार पडतात.

  1. पुल्लिंग 
  2. स्त्रीलिंग 
  3. नपुंसकलिंग

Important Pointsउभयलिंग - जी नामे दोन लिंगात मोडतात त्यांना उभयलिंग असे म्हणतात.

व दोनपेक्षा अधिक लिंगात मोडत असतील तर त्यांना बहुलिंगी म्हणतात.

उदा.पोर ,मूल ,बाग 

वरील  नाव या शब्दाचे लिंग हे उभयलिंग आहे.

Additional Information

पुल्लिंगनामावरून जेव्हा व्यक्ती किंवा वस्तूच्या पुरुष जातीचा बोध होत असेल तर त्याला पुल्लिंगी असे म्हणतात.

उदा : राम, मुलगा 

 स्त्रीलिंग : नामावरून जेव्हा व्यक्ती किंवा वस्तूच्या स्त्री जातीचा बोध होत असेल तर त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात.

उदा :  मुलगी, नदी 

 नपुंसकलिंग : नामावरून जेव्हा व्यक्ती किंवा वस्तूच्या पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही तेव्हा त्याला नपुंसकलिंग असे म्हणतात.

उदा : फुल, घड्याळ 

लिंग Question 3:

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

आईने माळ आणली.

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुसकलिंग
  4. उभयलिंग

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : स्त्रीलिंग

लिंग Question 3 Detailed Solution

माळ हा स्त्रीलिंगी शब्द आहे. आपण माळ या नामासाठी ती या सर्वनामाचा वापर करतो म्हणून माळ हा स्त्रीलिंगी शब्द आहे.

Additional Informationलिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.

लिंग हे तीन प्रकारचे आहे.

                1. पुल्लिंग

                2. स्त्रीलिंग

                3. नपुंसकलिंग

पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात. 

उदा.मुलगा, घोडा, फळा, भाला, सदरा इ.

स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. 

उदा.मुलगी, टोपली, घोडी, फळी, काठी, साडी इ.

नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.

उदा.पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.

लिंग Question 4:

दुकानदाराने पुस्तकांचे गठ्ठे बांधले (अधोरेखित नामाचे लिंग ओळखा)

  1. पुल्लिंग 
  2. स्त्रीलिंग 
  3. नपुंसकलिंग 
  4. उभयलिंग 

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : पुल्लिंग 

लिंग Question 4 Detailed Solution

लिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.

लिंग हे ३ प्रकारचे असते.

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुंसकलिंग

पुल्लिंग- ज्या नामावरून  पुरुष आहे असे समजते त्याला पुल्लिंग असे म्हणतात.

उदा- तो खोका, तो माठ इ. 

अशाचप्रकारे दुकानदाराने पुस्तकांचे गठ्ठे बांधले या वाक्यात दुकानदार हा पुल्लिंगी असल्याने त्याचे लिंग पुल्लिंग असे होईल.

लिंग Question 5:

लिंग बदला : बोका

  1. बोकी 
  2. बोकिळ 
  3. भाटी 
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : भाटी 

लिंग Question 5 Detailed Solution

​लिंग : नामावरून व्यक्ती किंवा वस्तूच्या पुरुष किंवा स्त्री जातीचा किंवा या दोन्हीपैकी कुठल्याच जातीचा नाही याचा बोध होतो त्याला लिंग असे म्हणतात.

Key Points

वस्तूचे लिंग काल्पनिक तर प्राण्यांचे लिंग वास्तविक असते.

Important Points

लिंगाचे खालील तीन प्रकार पडतात.

  1. पुल्लिंग : उदा - मुलगा
  2. स्त्रीलिंग : उदा - मुलगी 
  3. नपुंसकलिंग : उदा - मुलगे 

काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे ही स्वतंत्ररीतीने होतात.

उदा : राजा - राणी, वर - वधू.

वरील प्रश्नामधील बोका  हा शब्द पुल्लिंगी असून त्याचे स्त्रीलिंगी हे भाटी ( मांजर ) असे होते.

लिंग Question 6:

‘माझे गाव मला फार आवडते’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा

  1. पुल्लिंगी
  2. नपुंसकलिंगी
  3. स्त्रिलिंगी
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : नपुंसकलिंगी

लिंग Question 6 Detailed Solution

उत्तर व स्पष्टीकरण – नपुंसकलिंगी

ज्या नामावरुन त्या विशिष्ट  वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात. पुरुषलिंगासाठी आपण ‘तो’ हे सर्वनाम वापरतो.

उदा.राजा, झाडू, पंखा, रुमाल, भाला, सदरा इ.

ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. स्त्रीलिंगासाठी आपण ‘ती’ हे सर्वनाम वापरतो

उदा.राणी, टोपली, खुर्ची, रजई, काठी, साडी इ.

ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुरुषलिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुसकलिंग असे म्हणतात. नपुसकलिंगासाठी आपण ‘ते’ हे सर्वनाम वापरतो.

उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.

लिंग Question 7:

'विदुषी' हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे? 

  1. विदूषक
  2. मूर्ख
  3. विद्वान
  4. आयुष्य

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : विद्वान

लिंग Question 7 Detailed Solution

उत्तर - विदुषी हे विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे.

संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे  प्रत्यय लागून होतात.

उदा. विद्वान - विदुषी, युवा - युवती, भगवान - भगवती, श्रीमान - श्रीमती, कवी - कवयित्री, राजा - राज्ञी

Important Pointsलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.

लिंग हे तीन प्रकारचे आहे.

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुंसकलिंग
  • पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात. 
    • उदा. मुलगा, घोडा, फळा, भाला, सदरा इ.
  • स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. 
    • उदा. मुलगी, टोपली, घोडी, फळी, काठी, साडी इ.
  • नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.
    • उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.

लिंग Question 8:

'मीठभाकरी' या शब्दाचे लिंग कोणते?

  1. पुल्लिंग 
  2. स्त्रीलिंग 
  3. नंपुसकलिंग 
  4. अकारान्त पुल्लिंग 

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : स्त्रीलिंग 

लिंग Question 8 Detailed Solution

मीठभाकरी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. 

 Important Pointsमीठभाकरी हा शब्द सामासिक शब्द आहे आणि सामासिक शब्दांचे लिंग शेवटच्या शब्दावरुन ठरवतात.

मीठभाकरी - ती - स्त्रीलिंगी

पण सामासिक शब्द एकाच घटकासाठी वापरल्यास त्या घटकावरुन लिंग ठरवावे. उदा. बाईमाणूस - स्त्रीलिंगी

 Additional Informationलिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.

लिंग हे तीन प्रकारचे आहे.

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुंसकलिंग

पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात. 

उदा.राजा, झाडू, पंखा, भाला, सदरा इ.

स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. 

उदा.राणी, टोपली, खुर्ची, रजई, काठी, साडी इ.

नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.

उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.

लिंग Question 9:

"राजहंस" या नामाचे स्त्रीलिंगी रुप कोणते होईल ?

  1. राजहंस
  2. राजहंसी
  3. राजहंसिका
  4. राजहंसीनी

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : राजहंसी

लिंग Question 9 Detailed Solution

उत्तर - राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रुप राजहंसी हे होईल.

काही प्राणिवाचक अकारांत पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ईकारांत होतात.

उदा. हंस - हंसी, दास - दासी, वानर - वानरी

Important Pointsलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.

लिंग हे तीन प्रकारचे आहे.

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुंसकलिंग
  • पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात. 
    • उदा. मुलगा, घोडा, फळा, भाला, सदरा इ.
  • स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. 
    • उदा. मुलगी, टोपली, घोडी, फळी, काठी, साडी इ.
  • नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.
    • उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.

लिंग Question 10:

पुढील वाक्यातील शब्दाचे लिंग ओळखा.

वासरू हुंदडते.

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुंसकलिंग
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : नपुंसकलिंग

लिंग Question 10 Detailed Solution

उत्तर- वासरू हा शब्द नपुंसकलिंगी आहे. वासरू या नामावरून त्याचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही म्हणून वासरू हा शब्द नपुंसकलिंगी होईल तसेच वासरू या नामाच्या आधी तृतीय पुरुषी एकवचनी ते हे सर्वनाम वापरले जाते म्हणून वासरू हा शब्द नपुंसकलिंगी होईल.

Important Pointsलिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.

लिंग हे तीन प्रकारचे आहे.

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुंसकलिंग

पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात. 

उदा.मुलगा, घोडा, फळा, भाला, सदरा इ.

स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. 

उदा.मुलगी, टोपली, घोडी, फळी, काठी, साडी इ.

नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.

उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.

Get Free Access Now
Hot Links: teen patti all teen patti master teen patti sweet