वर्ण विचार MCQ Quiz in मल्याळम - Objective Question with Answer for वर्ण विचार - സൗജന്യ PDF ഡൗൺലോഡ് ചെയ്യുക

Last updated on Mar 22, 2025

നേടുക वर्ण विचार ഉത്തരങ്ങളും വിശദമായ പരിഹാരങ്ങളുമുള്ള മൾട്ടിപ്പിൾ ചോയ്സ് ചോദ്യങ്ങൾ (MCQ ക്വിസ്). ഇവ സൗജന്യമായി ഡൗൺലോഡ് ചെയ്യുക वर्ण विचार MCQ ക്വിസ് പിഡിഎഫ്, ബാങ്കിംഗ്, എസ്എസ്‌സി, റെയിൽവേ, യുപിഎസ്‌സി, സ്റ്റേറ്റ് പിഎസ്‌സി തുടങ്ങിയ നിങ്ങളുടെ വരാനിരിക്കുന്ന പരീക്ഷകൾക്കായി തയ്യാറെടുക്കുക

Latest वर्ण विचार MCQ Objective Questions

Top वर्ण विचार MCQ Objective Questions

वर्ण विचार Question 1:

'शरत्काल' या शब्दाचा संधी विग्रह काय होईल?

  1. शरत् + काल
  2. शर + त्काल
  3. शरद + काल
  4. शरद् + काल

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : शरद् + काल

वर्ण विचार Question 1 Detailed Solution

उत्तर- शरद् + काल

संधी: मराठी व्याकरणात एकापुढे एक आलेले स्वर, व्यंजने, विसर्ग जोडणे यांना ‘संधी' असे म्हणतात. संधीचे ३ प्रकार आहेत.

  1. स्वरसंधी
  2. व्यंजनसंधी
  3. विसर्गसंधी

Important Pointsव्यंंजन संधी: पहिल्या पाच वर्गांपैकी (क वर्ग, च वर्ग, त वर्ग, त वर्ग, प वर्ग) अनुनासिकाखेरीज कोणत्याही व्यंजनात पुढे कठोर व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो.
शब्द: शरत्काल
संधी विग्रह: शरद् + काल = द् + क् = त् + क् = त्क

अशाप्रकारे शरत्काल का संधीचा विग्रह शरद् + काल हा होईल.
इतर तिन्ही ही पर्याय हे व्याकरणिकदृष्ट्या चुकीची आहेत.

वर्ण विचार Question 2:

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

काल गारा पडल्या.

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुसकलिंग
  4. उभयलिंग

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : स्त्रीलिंग

वर्ण विचार Question 2 Detailed Solution

लिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.

लिंग हे ३ प्रकारचे आहे.

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुंसकलिंग

 

काल गारा पडल्या या वाक्यातील गारा हा शब्द आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे आणि त्यामुळे याचे लिंग स्त्रीलिंग होईल.

वर्ण विचार Question 3:

'मदतीसाठी आपला धनादेश कृपया खालील पत्या वर पाठवावा' या वाक्यात कोणते आख्यात वापरले आहे ?

  1. लाख्यात
  2. वाख्यात
  3. ई-आख्यात
  4. प्रथम ताख्यात

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : वाख्यात

वर्ण विचार Question 3 Detailed Solution

आख्यात विचार-

क्रियापदामध्ये होणाऱ्या बदलांना आख्यात विचार असे म्हणतात.

ते बदल ५ प्रकारे होत असतात.

  1. काळ 
  2. लिंग
  3. अर्थ
  4. वचन
  5. पुरुष

काळानुसार होणाऱ्या बदलांचे प्रकार-

काळ आख्याताचे नाव उदाहरण
वर्तमानकाळ प्रथम ता आख्यात  करते
भूतकाळ ला आख्यात  करत होती
रीति भूतकाळ ई आख्यात करत असे
भविष्यकाळ इलाख्यात करेन
आज्ञार्थी ऊ आख्यात कर
विध्यर्थी वाख्यात करावा 
संकेतार्थी द्वितीय ता आख्यात करू शकशील

 

अशाप्रकारे 'मदतीसाठी आपला धनादेश कृपया खालील पत्या वर पाठवावा' हे वाक्य विध्यर्थी वाक्य आहे आणि त्यामुळे या आख्याताचे नाव वाख्यात असल्याने हाच पर्याय योग्य राहील.

वर्ण विचार Question 4:

'वचन विचार' लक्षात घेऊन प्रस्तुत पर्यायांपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

  1. भाकरी
  2. बी
  3. नळी
  4. सभा

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : सभा

वर्ण विचार Question 4 Detailed Solution

वचन-

नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्या गुणधर्मास 'वचन' असे म्हणतात.

'वचन' या शब्दाचा शब्दश: अर्थ बोलणे असा होतो.

वचनाचे 2 प्रकार पडतात.

  1. एकवचन
  2. अनेकवचन

एकवचन -

जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात.

उदा. वही, गाडी,खुर्ची, बादली,मासा, गाय, फूल, मुलगा इ.

अनेकवचन-

जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात. अनेकवचनासच बहुवचन असेही म्हणतात.

उदा. वह्या,गाड्या, खुर्च्या,बादल्या,मासे, गाई, फुले, मुलगे इ.

Important Pointsप्रस्तुत स्पष्टीकरणावरून आपणास लक्षात येते की,  भाकरी ह्या शब्दाचे अनेकवचन भाकर्‍या असे होईल, बी या शब्दाचे अनेकवचन बिया असे होईल आणि नळी याचे अनेकवचन नळ्या असे होईल.

केवळ सभा या शब्दाचे अनेकवचन सभा असेच राहील.

अशाप्रकारे इतर तिन्हीही शब्दांचे अनेकवचन याकारांत होते केवळ सभा या शब्दाचे अनेकवचन याकारांत होत नाही.

म्हणून 'वचन विचार' लक्षात घेऊन प्रस्तुत पर्यायांपैकी गटात न बसणारा शब्द सभा हा आहे.

वर्ण विचार Question 5:

शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.

  1. प्रातिनिधिक
  2. प्रातिनिधीक
  3. प्रतिनिधीक
  4. प्रतिनिधिक

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : प्रातिनिधिक

वर्ण विचार Question 5 Detailed Solution

शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे प्रातिनिधिक हा शुद्ध शब्द होईल.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.

वर्ण विचार Question 6:

घाशीराम कोतवाल व सखाराम बाईंडर या नाटकाचे नाटककार कोण?

  1. पु. ल. देशपांडे
  2. वि. वा. शिरवाडकर
  3. विजय तेंडुलकर
  4. प्रल्‍हाद केशव अत्रे

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : विजय तेंडुलकर

वर्ण विचार Question 6 Detailed Solution

घाशीराम कोतवाल हे विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहिलेले मराठी नाटक आहे.

सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक मराठी नाटक आहे. हे नाटक स्त्रीवादी दृष्टिकोनातून आहे.

वरील दिलेल्याप्रमाणे घाशीराम कोतवाल व सखाराम बाईंडर या नाटकाचे नाटककार विजय तेंडुलकर हे आहेत.

वर्ण विचार Question 7:

संयुक्त नसणारा स्वर ओळखा.

  1. ए 
  2. औ 
  3. इ 
  4. ओ 

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : इ 

वर्ण विचार Question 7 Detailed Solution

स्वर : जिभेचा मुखातील भागाशी किंवा ओठांचा एकमेकांशी स्पर्श न होता जे ध्वनी हे तोंडावाटे बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात.

वर्णमालेत एकूण १४ स्वर२ स्वरादी आहेत.

Important Points

स्वरांचे एकूण चार प्रकार पडतात.

  1. ऱ्हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. उदा : अ, इ,उ 
  2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. उदा : आ, ई, ऊ  
  3. संयुक्त स्वर : दोन स्वरांचे मिळून जे स्वर तयार होतात त्यांना सयुक्त स्वर असे म्हणतात. उदा : ए = अ + इ/ई , ऐ = आ + इ/ई , ओ = अ + उ/ऊ , औ = आ + उ/ऊ 
  4. इंग्रजी स्वर : जे स्वर इंग्रजी भाषेतून मराठीत आले आहेत त्यांना इंग्रजी सार असे म्हणतात. उदा : ऑ 

 

वरील पर्यायांपैकी ए, औ, ओ हे सर्व संयुक्त स्वर आहेत आणि इ हा ऱ्हस्व स्वर आहे. 

वर्ण विचार Question 8:

रीति वर्तमानकाळातील वाक्‍य कोणते?

  1. ती नाचत असे.
  2. सूर्य पूर्वेला उगवत असतो. 
  3. सूर्य किरणाने धरती उजळून निघत असे.
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : सूर्य पूर्वेला उगवत असतो. 

वर्ण विचार Question 8 Detailed Solution

मुख्य काळ ३ आहेत-
  1. वर्तमानकाळ
  2. भूतकाळ
  3. भविष्यकाळ
काळांचे उपप्रकार-
  1. अपूर्ण काळ
  2. पूर्ण काळ
  3. रीति काळ

Important Pointsहे तिन्ही उपप्रकार वर्तमानकाळ, भूतकाळ व भविष्यकाळाला देखील लागू पडतात.

जसे की, अपूर्ण वर्तमानकाळ, पूर्ण वर्तमानकाळ, रीति वर्तमानकाळ

रीति वर्तमानकाळ- वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत करीत असण्याची रीत समजली तर त्याला रीतिवर्तमानकाळ असे म्हणतात.

उदा-

  1. मधू लाडू खात असतो.
  2. मी निबंध लिहित असतो.

 

अशाचप्रकारे प्रस्तुत पर्यायांपैकी 'सूर्य पूर्वेला उगवत असतो' हे रीति वर्तमानकाळातील वाक्य आहे.

वर्ण विचार Question 9:

खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखा.  

  1. अलिकडे
  2. पत्रदर्शनी
  3. अष्टपैलू 
  4. परिग्रह

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : अलिकडे

वर्ण विचार Question 9 Detailed Solution

स्पष्टीकरण- मराठी भाषेत भाषेच्या शुद्धतेला अत्यंत महत्त्व आहे. एका अक्षराच्या फरकाने सुद्धा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे शुद्धलेखन करणे ही प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

प्रस्तुत पर्यायांपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अलिकडे हा शब्द अयोग्य आहे. शुद्ध शब्द अलीकडे असा आहे. 

अन्य पर्याय हे योग्य आहेत.

वर्ण विचार Question 10:

पुढील पैकी संयुक्त स्वर कोणते?

  1. आ, ई, ऊ, ओ
  2. ऊ, लृ, ई, झ
  3. अ, इ, ई, उ
  4. ए, ऐ, ओ, औ

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : ए, ऐ, ओ, औ

वर्ण विचार Question 10 Detailed Solution

उत्तर - ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत.

संयुक्त स्वर - ए, ऐ, ओ, औ हे स्वर इतर दोन स्वरांचे मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराचे असतात.

  • ए = अ + इ / ई     
  • ऐ = आ + इ / ई       
  • ओ = अ + उ / ऊ       
  • औ = आ + उ / ऊ

याशिवाय स्वरांचे सजातीय स्वर व विजातीय स्वर असे उच्चारस्थानांवरून दोन प्रकार पडतात.

सजातीय स्वर - एकाच उच्चारस्थानातून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात.
उदा. अ - आ, इ - ई, उ - ऊ

विजातीय स्वर - भिन्न उच्चारस्थानातून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात.
उदा. अ - इ, अ - उ, इ - ए, अ - ऋ

Important Pointsस्वर - ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. वर्णमालेत एकूण 12 स्वर आहेत. ॲ, ऑ हे इंग्रजीतून मराठीत आलेले स्वर आहेत.

स्वरांचे तीन प्रकार पडतात.

  1. ह्रस्व स्वर
  2. दीर्घ स्वर
  3. संयुक्त स्वर

​ह्रस्व स्वर - अ, इ, उ, ऋ, लृ या स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे उच्चार करावयास कमी कालावधी लागतो म्हणून त्यांना ​ह्रस्व स्वर म्हणतात. 

दीर्घ स्वर - आ, ई, ऊ या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो म्हणजेच लांबट उच्चार होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. 

संयुक्त स्वर - ए, ऐ, ओ, औ हे स्वर इतर दोन स्वरांचे मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराचे असतात.

Get Free Access Now
Hot Links: teen patti classic teen patti rich online teen patti real money real teen patti