वचन MCQ Quiz in मल्याळम - Objective Question with Answer for वचन - സൗജന്യ PDF ഡൗൺലോഡ് ചെയ്യുക

Last updated on Apr 4, 2025

നേടുക वचन ഉത്തരങ്ങളും വിശദമായ പരിഹാരങ്ങളുമുള്ള മൾട്ടിപ്പിൾ ചോയ്സ് ചോദ്യങ്ങൾ (MCQ ക്വിസ്). ഇവ സൗജന്യമായി ഡൗൺലോഡ് ചെയ്യുക वचन MCQ ക്വിസ് പിഡിഎഫ്, ബാങ്കിംഗ്, എസ്എസ്‌സി, റെയിൽവേ, യുപിഎസ്‌സി, സ്റ്റേറ്റ് പിഎസ്‌സി തുടങ്ങിയ നിങ്ങളുടെ വരാനിരിക്കുന്ന പരീക്ഷകൾക്കായി തയ്യാറെടുക്കുക

Latest वचन MCQ Objective Questions

Top वचन MCQ Objective Questions

वचन Question 1:

माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा.

  1. माळी
  2. माळा
  3. माळ
  4. माळ्या

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : माळी

वचन Question 1 Detailed Solution

मराठी वचनविचार करतांना एक नियम असा आहे की, आकारान्तशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांची दोन्ही रूपे ही दोन्ही वचनात सारखीच असतात.
माळी या एकवचनी शब्दाचे अनेकवचनसुद्धा माळी असेच होईल. 

वचन Question 2:

हार या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते?

  1. हारे

  2. हारं

  3. हार

  4. हारी

Answer (Detailed Solution Below)

Option 3 :

हार

वचन Question 2 Detailed Solution

उत्तर व स्पष्टीकरण - हार

वचन- नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्या गुणधर्मास 'वचन' असे म्हणतात.

'वचन' या शब्दाचा शब्दश: अर्थ बोलणे असा होतो. 

वचनाचे 2 प्रकार पडतात-

  1. एकवचन
  2. अनेकवचन
  •  

नियम- आ-कारान्त नामांव्यतिरिक्त इतर सर्व पुल्लिंगी नामांची रुपे दोन्ही वचनांत सारखीच असतात.

  • पक्षी- पक्षी     
  • केस- केस 
  • ढग- ढग 
  • देव- देव

वचन Question 3:

शित या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते?

  1. शित
  2. शिते
  3. शितु
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : शिते

वचन Question 3 Detailed Solution

उत्तर व स्पष्टीकरण - शिते 

वचन-

नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्या गुणधर्मास 'वचन' असे म्हणतात.

'वचन' या शब्दाचा शब्दश: अर्थ बोलणे असा होतो. 

वचनाचे प्रकार-

  1. एकवचन
  2. अनेकवचन

नियम- अ-कारान्त/ऊकारान्त नपुंसकलिंगी नामांचे अनेकवचन ए-कारान्त होते.

  • ससा- ससे
  • लांडगा- लांडगे
  • महिना- महिने
  • दाणा- दाणे

वचन Question 4:

खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचन या कारांत होत नाही?

  1. ससा
  2. गाडी
  3. काठी
  4. नदी

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : ससा

वचन Question 4 Detailed Solution

उत्तर- ससा या शब्दाचे अनेकवचन या कारांत होत नाही.

ससा या कारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ससे (ए कारांत) असे होते.

 Key Points कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन या कारांत होते. उदा. गाडी - गाड्या, काठी - काठ्या, नदी - नद्या

Important Pointsलिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.

लिंग हे तीन प्रकारचे आहे.

  1. पुल्लिंग
  2. स्त्रीलिंग
  3. नपुंसकलिंग

पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात. 

उदा.मुलगा, घोडा, फळा, भाला, सदरा इ.

स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. 

उदा.मुलगी, टोपली, घोडी, फळी, काठी, साडी इ.

नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.

उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.

वचन Question 5:

योग्य शब्द वापरा.

काल ______ पडल्या.

  1. गारांनी
  2. गारे
  3. गारा
  4. गारी

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : गारा

वचन Question 5 Detailed Solution

​वरील दिलेल्या वाक्यात काल गारा पडल्या यात गारा हा योग्य पर्याय आहे.

वरील वाक्यात पडल्या या क्रियापदानुसार गारा हा योग्य पर्याय आहे.

वचन Question 6:

देव या नामाचे अनेक रुप कोणते.

  1. देव
  2. देवे
  3. देवता
  4. दैव

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : देव

वचन Question 6 Detailed Solution

उत्तर - देव या नामाचे अनेकवचन देव असेच राहते.

आकारांतशिवाय इतर पुल्लिंगी नामची रूपे दोन्ही वचनांत सारखीच असतात.

उदा. शत्रू - शत्रू, खडू - खडू, कवी - कवी, पर्वत - पर्वत, हत्ती - हत्ती, देव - देव

Important Pointsवचन - जेव्हा आपण नामाच्या रूपावर ती वस्तू किंवा प्राणी एक आहे कि अनेक आहे याचा बोध होतो त्यास वचन असे म्हणतात. वचन बदलताना काही नामांचे रूप बदलते, तर काहींचे तेच राहते.

मराठी व्याकरणात वचनाचे दोन प्रकार पडतात.

  1. एकवचन
  2. अनेकवचन

एकवचन - जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात. उदा. वीट, सोय, चूक, पंखा इ.

अनेकवचन - जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात. उदा. विटा, सोई, चुका, पंखे इ.

वचन Question 7:

खालीलपैकी कोणत्या गटातील शब्दांची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत ?

(अ) पुस्तक, फळा, भाकरी, इमारत

(ब) वासरू, आसू, जळू, गाणे 

(क) काका, शाळा, उंदीर, देश

(ड) गुरुजी, कवी, पाणी, पाऊस

  1. (अ) व (क) बरोबर
  2. (अ) व (ड) बरोबर
  3. (ब) व (क) बरोबर
  4. (क) व (ड) बरोबर

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : (क) व (ड) बरोबर

वचन Question 7 Detailed Solution

वरील प्रश्नात (क) व (ड)  हे पर्याय बरोबर आहे. 

काका, शाळा, उंदीर, देश, गुरुजी, कवी, पाणी, पाऊस या शब्दाची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत. ती एकवचनी आणि अनेकवचनी रुपात सारखीच राहतात.

Important Pointsवस्तू एक आहे की अनेक आहेत ते सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात वचन असे म्हणतात.

वचनाचे प्रकार -

  1. एकवचन
  2. अनेकवचन

 

  1. एकवचन - जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात.   उदा. मासा, गाय, फूल, मुलगा इ.
  2. अनेकवचन - जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात.  उदा. मासे, गाई, फुले, मुलगे इ.

उदाहरणांचे स्पष्टीकरण-

  • पुस्तक - पुस्तके, फळा - फळे, भाकरी - भाकऱ्या,  इमारत - इमारती
  • वासरू - वासरे, आसू - आसवे, जळू - जळवा, गाणे - गाणी
  • काका - काका, शाळा - शाळा, उंदीर - उंदीर, देश - देश
  • गुरुजी - गुरुजी, कवी - कवी, पाणी - पाणी, पाऊस - पाऊस

वचन Question 8:

एकवचनाचे अनेकवचन करा.

तुरूंगातील कैद्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो.

  1. तुरूंगातील कैद्यावर जीवघेणा हल्ले होऊ शकतो.
  2. तुरूंगातील कैद्यावर जीवघेणे हल्ले होऊ शकतो.
  3. तुरूंगांतील कैद्यांवर जीवघेणे हल्ले होऊ शकतात.
  4. तुरूंगांतील कैद्यांवर जीवघेणा हल्ला होऊ शकतात.

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : तुरूंगांतील कैद्यांवर जीवघेणे हल्ले होऊ शकतात.

वचन Question 8 Detailed Solution

वचन-

नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्या गुणधर्मास 'वचन' असे म्हणतात.

'वचन' या शब्दाचा शब्दश: अर्थ बोलणे असा होतो.

वचनाचे प्रकार-

  1. एकवचन
  2. अनेकवचन

एकवचन -

जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात.

उदा. वही, गाडी,खुर्ची, बादली,मासा, गाय, फूल, मुलगा इ.

अनेकवचन-

जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात. अनेकवचनासच बहुवचन असेही म्हणतात.

उदा. वह्या,गाड्या, खुर्च्या,बादल्या,मासे, गाई, फुले, मुलगे इ.

Important Points

तुरूंगातील कैद्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो. हे वाक्य एकवचनातील आहे. 

या वाक्याचे अनेकवचन तुरूंगांतील कैद्यांवर जीवघेणे हल्ले होऊ शकतात. हा होईल.

वचन Question 9:

लाटणे या एकवचनी नामाचे अनेकवचन असणारा पर्याय निवडा ?

  1. लाटणे
  2. लाटण्या
  3. लाटण
  4. लाटणी

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : लाटणी

वचन Question 9 Detailed Solution

योग्य उत्तर लाटणी

Key Points

स्पष्टीकरण: 'लाटणे' हा शब्द एकवचनी आहे, जो स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या साधनासाठी वापरला जातो. याचे अनेकवचन लाटणी असे होते, म्हणजेच लाटण्याचे अनेक प्रकार किंवा संख्या.

  • लाटणे हे एकवचनी नाम आहे.
  • याचे अनेकवचन रूप लाटणी आहे.
  • पर्याय लाटण आणि लाटण्या हे योग्य नाहीत.
  • म्हणून, योग्य उत्तर आहे लाटणी.

वचन Question 10:

खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रुपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत?

  1. आंबा, केळ, रताळे, पपई
  2. शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू
  3. नदी, बी, स्त्री, काठी, भाकरी
  4. ससा, कुत्रा, लांडगा, घोडा, म्हैस

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू

वचन Question 10 Detailed Solution

उत्तर - शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू या शब्दांची रुपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत.

Important Pointsवचन - जेव्हा आपण नामाच्या रूपावर ती वस्तू किंवा प्राणी एक आहे कि अनेक आहे याचा बोध होतो त्यास वचन असे म्हणतात. वचन बदलताना काही नामांचे रूप बदलते, तर काहींचे तेच राहते.

मराठी व्याकरणात वचनाचे दोन प्रकार पडतात.

  1. एकवचन
  2. अनेकवचन

एकवचन - जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात. उदा. वीट, सोय, चूक, पंखा इ.

अनेकवचन - जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात. उदा. विटा, सोई, चुका, पंखे इ.

एकवचन अनेकवचन
आंबा आंबे
केळ/केळे केळी
रताळे रताळी
पपई पपया
नदी नद्या
बी बिया
स्त्री स्त्रिया
काठी काठ्या
भाकरी भाकऱ्या
ससा ससे
कुत्रा कुत्रे
लांडगा लांडगे
घोडा घोडे
म्हैस म्हशी

Hot Links: teen patti earning app teen patti stars rummy teen patti teen patti master game