समूहदर्शक शब्द MCQ Quiz in मल्याळम - Objective Question with Answer for समूहदर्शक शब्द - സൗജന്യ PDF ഡൗൺലോഡ് ചെയ്യുക

Last updated on Mar 26, 2025

നേടുക समूहदर्शक शब्द ഉത്തരങ്ങളും വിശദമായ പരിഹാരങ്ങളുമുള്ള മൾട്ടിപ്പിൾ ചോയ്സ് ചോദ്യങ്ങൾ (MCQ ക്വിസ്). ഇവ സൗജന്യമായി ഡൗൺലോഡ് ചെയ്യുക समूहदर्शक शब्द MCQ ക്വിസ് പിഡിഎഫ്, ബാങ്കിംഗ്, എസ്എസ്‌സി, റെയിൽവേ, യുപിഎസ്‌സി, സ്റ്റേറ്റ് പിഎസ്‌സി തുടങ്ങിയ നിങ്ങളുടെ വരാനിരിക്കുന്ന പരീക്ഷകൾക്കായി തയ്യാറെടുക്കുക

Latest समूहदर्शक शब्द MCQ Objective Questions

Top समूहदर्शक शब्द MCQ Objective Questions

समूहदर्शक शब्द Question 1:

चुकीची जोडी निवडा.

  1. पांढरा परीस- लबाड
  2. पिकलेले पान- म्हातारा
  3. गुरुकिल्ली- मर्म
  4. खडाजंगी- अतिशय तापट

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : खडाजंगी- अतिशय तापट

समूहदर्शक शब्द Question 1 Detailed Solution

आलंकारिक शब्द म्हणजे काय - ज्याप्रमाणे अलंकार, पोशाख, केशरचना या मानवाच्या सौंदर्यात भर घालतात; तसेच म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात. सर्व भाषामध्ये यांचा वापर केला जातो. कमी शब्दामध्ये व्यापक अर्थ अलंकारिक शब्दातून सांगितला जातो. आलंकारिक शब्दाचा शाब्दिक अर्थ लक्षात न घेता त्यामागील भावार्थ समजून घेणे आवश्यक असते. म्हणून आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. आलंकारिक शब्दांचा अर्थ माहित नसेल तर त्यातून चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. 

वरील दिलेल्या जोड्यांमध्ये अलंकारिक शब्द व त्याचे अर्थ अश्या जोड्या दिल्या आहेत.

वरील खडाजंगी- अतिशय तापट ही जोडी चुकीची आहे कारण खडाजंगी याचा अर्थ जोरदार मोठे भांडण  असा होतो किंवा जोराचे भांडण असा होतो.व वरील बाकी सर्व लंकारिक शब्द व अर्थाच्या जोड्या योग्य आहेत.

अशा प्रकारे वरील खडाजंगी- अतिशय तापट ही  चुकीची जोडी आहे.

समूहदर्शक शब्द Question 2:

खाली दिलेल्या शब्दांसाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.

उपकारासाठी ओशाळ बनलेला

  1. बेवारस
  2. मिंधा
  3. मंद
  4. आश्रित

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : मिंधा

समूहदर्शक शब्द Question 2 Detailed Solution

समूहदर्शक शब्द- भावना व्यक्त करण्यासाठी अनेक शब्दांचा वापर न करता त्यासाठी एकच शब्द वापरला जातो त्यास समूहदर्शक शब्द असे म्हणतात.

उपकारासाठी ओशाळ बनलेला या शब्दसमूहासाठी मिंधा हा शब्द योग्य आहे.

उदा- मोहनच्या उपचाराचे पैसे रमेश ने भरल्याने मोहन रमेश चा मिंधा झाला.

अन्य पर्यायांचे स्पष्टीकरण-

  • बेवारस- ज्याला कोणी मालक नाही असा
  • मंद- डोक्याने कमी असलेला
  • आश्रित- दुसऱ्यांचा आश्रय घेऊन राहणारा

समूहदर्शक शब्द Question 3:

खालीलपैकी योग्‍य पर्याय निवडा.

काजूंची असते______.

  1. तुकडी
  2. गाथण
  3. चळत
  4. जुडी

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : गाथण

समूहदर्शक शब्द Question 3 Detailed Solution

समूहदर्शक शब्द- समूहदर्शक शब्द म्हणजे एखाद्या वस्तूंचा किंवा गोष्टींच्या एकत्रित गटाला दिलेली उपमा होय.

काजूंची असते ती ___ यासाठी प्रस्तुत पर्यायांपैकी  गाथण हा योग्य पर्याय आहे. Additional Information

अन्य पर्यायांचे स्पष्टीकरण-

  1. सैनिकांची- तुकडी
  2. नाण्यांची- चळत
  3. दुर्वांची- जुडी

समूहदर्शक शब्द Question 4:

चुकीची जोडी ओळखा

  1. नाण्यांची - चळत
  2. धान्याची - चवड
  3. नोटांचे - पुडके
  4. साधूंचा - जथा

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : धान्याची - चवड

समूहदर्शक शब्द Question 4 Detailed Solution

उत्तर- धान्याची- चवडImportant Points 
  • बोलत असताना काहीवेळा आपण अनेकवचनासाठी काही विशिष्ट शब्द वापरतो त्यांना 'समूहदर्शक शब्द' असे म्हणतात. 
          उदा- खेळाडूंचा- संघ, द्राक्षांचा- घड. 
  • धान्याच्या मोठ्या ढिगास आपण 'रास' असे म्हणतो. तर भाकऱ्या किंवा रुपयांच्या ढिगास आपण 'चवड' असे म्हणतो. म्हणून 'धान्याची चवड' ही जोडी चुकीची आहे. 
Additional Informationइतर काही समूहदर्शक शब्द-
  • आंब्यांच्या झाडांची - राई 
  • प्रश्न पत्रिकांचा- संच 
  • उंटांचा, लमाणांचा- तांडा 
  • पालेभाजीची- गड्डी/जुडी 
  • नोटांची, पोत्यांची- थप्पी   
  • करवंदांची- जाळी 
  • जहाजांचा- काफिला 
  • माणसांचा- जमाव 
  • बांबूचे- बेट 

समूहदर्शक शब्द Question 5:

स्वतःशी केलेले भाषण

  1. संभाषण
  2. सुभाषित
  3. स्वगत
  4. समारोप

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : स्वगत

समूहदर्शक शब्द Question 5 Detailed Solution

उत्तर - स्वतःशी केलेले भाषण म्हणजे स्वगत होय.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय.

Additional Informationसंभाषण म्हणजे एकापेक्षा अधिक माणसांचे आपसातील बोलणे होय.

सुभाषित म्हणजे बोधपर वचन होय.

एखादी गोष्ट संपण्याची क्रिया म्हणजे समारोप होय.

समूहदर्शक शब्द Question 6:

'ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर' - या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा.

  1. आवृत्ती
  2. प्रक्षिप्त
  3. प्रकरण
  4. प्रहसन

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : प्रक्षिप्त

समूहदर्शक शब्द Question 6 Detailed Solution

शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय.

प्रक्षिप्त - ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर'.

प्रक्षिप्त म्हणजे  एखाद्या ग्रंथात ग्रंथकाराव्यतिरिक्त दुसर्‍या कुणीतरी मागाहून घातलेला.

उदा - तुकोबांच्या गाथेतील काही अभंग प्रक्षिप्त आहेत.

वरील दिलेल्याप्रमाणे 'ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर'या साठी प्रक्षिप्त हा योग्य शब्द आहे.

अशा प्रकारे वरील प्रक्षिप्त हा योग्य पर्याय आहे.

समूहदर्शक शब्द Question 7:

स्वतःच्या फायद्याचे पाहणारा-

  1. स्वार्थपरायण
  2. अप्पलपोटा
  3. घरभेदी
  4. कळलावू

  1. फक्त 1
  2. 3 आणि 4
  3. 1 आणि 2
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : 1 आणि 2

समूहदर्शक शब्द Question 7 Detailed Solution

समूहदर्शक शब्द - भावना व्यक्त करण्यासाठी अनेक शब्दांचा वापर न करता त्यासाठी एकच शब्द वापरला जातो त्यास समूहदर्शक शब्द असे म्हणतात.

स्वतःच्या फायद्याचे पाहणारा यासाठी स्वार्थपरायण आणि अप्पलपोटा हे दोन्हीही शब्द योग्य आहेत.

अशाप्रकारे पर्याय क्र. 1 आणि 2 बरोबर आहेत.

समूहदर्शक शब्द Question 8:

दु:खाने सोडलेला लांब श्वास यासाठी शब्द सांगा.

  1. दीर्घ श्वास
  2. नि:श्वास
  3. सुस्कारा
  4. उच्छ्वास

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : सुस्कारा

समूहदर्शक शब्द Question 8 Detailed Solution

समूहदर्शक शब्द-

अनेक शब्दांऐवजी एक शब्द वापरून वाक्याला अर्थपूर्ण बनविता येते.

उगाच पाल्हाळ न लावता एका शब्दात त्या अर्थाची महती आपल्यापर्यंत पोहोचते.

दु:खाने सोडलेला लांब श्वास यासाठी सुस्कारा हा शब्द योग्य आहे.

समूहदर्शक शब्द Question 9:

नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत - यासाठी पर्यांयी शब्द निवडा.

  1. अभंग
  2. नांदी
  3. स्वगत
  4. भरतवाक्य
  5. यापैकी एकही नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : नांदी

समूहदर्शक शब्द Question 9 Detailed Solution

शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय.

नांदी - नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत.

नांदी म्हणजे - एखादे कार्य वा गोष्ट सुरू होण्याची क्रिया,किंवा आरंभ ,प्रारंभ,सुरुवात.

वरील दिलेल्याप्रमाणे नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत या साठी योग्य शब्दसमूह नांदी हा आहे.

अशा प्रकारे वरील नांदी हा योग्य पर्याय आहे.

समूहदर्शक शब्द Question 10:

पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

शोकाचे वर्णन करणारी कविता

  1. शोकांतिका
  2. विलापिका
  3. हृदयद्रावक
  4. विडंबन

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : विलापिका

समूहदर्शक शब्द Question 10 Detailed Solution

उत्तर - शोकाचे वर्णन करणारी कविता म्हणजे विलापिका होय.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय.

Additional Informationशोकांतिका हा कथा, नाटक, चित्रपट, इ.चा एक प्रकार आहे. यात कथानकाचा अंत दुःखद होतो. 

हृदयद्रावक म्हणजे अंतःकरणाला पाझर फोडणारे होय.

विडंबन म्हणजे दोषांवर विनोदी पद्धतीने केलेली टीका होय.

Hot Links: teen patti list teen patti rummy teen patti joy official