म्हणी व वाक्प्रचार MCQ Quiz in বাংলা - Objective Question with Answer for म्हणी व वाक्प्रचार - বিনামূল্যে ডাউনলোড করুন [PDF]
Last updated on Apr 5, 2025
Latest म्हणी व वाक्प्रचार MCQ Objective Questions
Top म्हणी व वाक्प्रचार MCQ Objective Questions
म्हणी व वाक्प्रचार Question 1:
'डोळ्यात खुपणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
Answer (Detailed Solution Below)
म्हणी व वाक्प्रचार Question 1 Detailed Solution
वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात.
'डोळ्यात खुपणे' या वाक्प्रचार योग्य अर्थ 'यश सहन न होणे' हा होतो.
उदा- संदीपची प्रगती मनीषाच्या डोळ्यात खुपते.
म्हणी व वाक्प्रचार Question 2:
‘उठता लाथ बसता बुक्की’ ह्या म्हणीचा अर्थ काय होतो?
Answer (Detailed Solution Below)
म्हणी व वाक्प्रचार Question 2 Detailed Solution
उठता लाथ बसता बुक्की या म्हणीचा अर्थ होतो कायम धाकात ठेवणे.
उदा. सरकारने जनतेची ‘उठता लाथ बसता बुक्की’ अशी परिस्थिती केली आहे.
म्हणी व वाक्प्रचार Question 3:
कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्प्रचार कोणता आहे?
Answer (Detailed Solution Below)
म्हणी व वाक्प्रचार Question 3 Detailed Solution
वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात.
प्रस्तुत पर्यायांपैकी कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्प्रचार अग्निदिव्य करणे असा होतो.
वाक्यात उपयोग- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.
म्हणी व वाक्प्रचार Question 4:
'आच लागणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
म्हणी व वाक्प्रचार Question 4 Detailed Solution
वाक्प्रचार : वाक्प्रचार हा शब्दांचा समूह असतो. वाक्प्रचार हा कोणत्याही वाक्यात जसाच्या तसा वापरला जातो. वाक्प्रचाराचा शेवट हा नेहमी क्रियापदाने होत असतो.
'आच लागणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ झळ लागणे असा होतो.
उदा- पाऊस न आल्याने शेतकऱ्यांना आच लागली.
वरील दिल्याप्रमाणे आच लागणे' - झळ लागणे हा अर्थ योग्य आहे.
Additional Information
अन्य पर्यायांचे स्पष्टीकरण-
- आभाळ कोसळणे - फार मोठे संकट येणे.
- धाबे दणाणणे - खूप घाबरणे.
- डोळा लागणे - झोप लागणे.
म्हणी व वाक्प्रचार Question 5:
'एखाद्या क्षुल्लक गोष्टीकडे वेळीच लक्ष न दिल्यास ती पुढे डोईजड होते.' या अर्थाची कोणती 'म्हण' आहे?
खालील पर्यायांतून अचूक पर्याय निवडा.
Answer (Detailed Solution Below)
म्हणी व वाक्प्रचार Question 5 Detailed Solution
उत्तर - एखाद्या क्षुल्लक गोष्टीकडे वेळीच लक्ष न दिल्यास ती पुढे डोईजड होते. या अर्थाची म्हण तण - खाई धन ही होईल.
म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.
Additional Informationथेंबे थेंबे तळे साचे याचा अर्थ काटकसर केल्यास बरीच शिल्लक मागे पडते असा होतो.
खायला काळ अन् धरणीला भार याचा अर्थ ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो असा होतो.
एका लबाडीच्या योगे, बहु येती तिच्या मागे याचा अर्थ मनुष्याने एक लबाडी केली म्हणजे ती पचविण्यासाठी हजार लबाड्या कराव्या लागतात असा होतो.
म्हणी व वाक्प्रचार Question 6:
खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
ऐंशी तेथे पंच्याऐंशी
Answer (Detailed Solution Below)
म्हणी व वाक्प्रचार Question 6 Detailed Solution
म्हण : ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.
ऐंशी तेथे पंच्याऐंशी म्हणजेच अतिशय उधळेपणाची वृत्ती म्हणजेच उधळपट्टी करणे होय.
अशा प्रकारे वरील अतिशय उधळेपणाची वृत्ती हा योग्य पर्याय आहे.
म्हणी व वाक्प्रचार Question 7:
कोल्हेकुई : ?? :: बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचने
Answer (Detailed Solution Below)
म्हणी व वाक्प्रचार Question 7 Detailed Solution
वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात.
Important Pointsस्पष्टीकरण-
- आपणास लक्षात येते की, येथे वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ देण्यात आलेले आहेत.
- ज्याप्रमाणे बोलाचीच कढी या वाक्प्रचाराचा अर्थ केवळ शाब्दिक वचने असा होतो. त्याचप्रमाणे कोल्हेकुई करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निरर्थक बडबड करणे असा होतो.
- वाक्यात उपयोग- काही लोक काम कमी आणि कोल्हेकुईच जास्त करतात.
अशाप्रकारे निरर्थक बडबड हा पर्याय योग्य आहे.
म्हणी व वाक्प्रचार Question 8:
उडत्या पाखराची पिसे मोजणे या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.
Answer (Detailed Solution Below)
म्हणी व वाक्प्रचार Question 8 Detailed Solution
म्हण- मनुष्याला येणारा अनुभव एखाद्या छोट्या वाक्यात मांडून दाखविलेला असतो. अशी वाक्ये लोकांच्या सतत म्हणण्यात किंवा वापरण्यात असतात त्यांना म्हण असे म्हणतात.
Important Pointsउडत्या पाखराची पिसे मोजणे या म्हणीचा योग्य अर्थ सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे हाच होईल.
उदा- बऱ्याचदा रोजच्या बोलण्यातदेखील आपण ही म्हण वापरत असतो. कोणी आपल्या कर्तृत्वावर शंका घेतल्यास आपण सहज म्हणून जातो, 'तुला काय मी एवढी सोपी वाटले का? उडत्या पाखराचे पिसे मोजू शकते मी.'
अशाप्रकारे पर्याय ४ बरोबर आहे.
म्हणी व वाक्प्रचार Question 9:
'टिटवी देखील समुद्र आटविते' या म्हणीचा अर्थ सांगा.
Answer (Detailed Solution Below)
म्हणी व वाक्प्रचार Question 9 Detailed Solution
उत्तर: सामान्य शुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.
स्पष्टीकरण: वरील म्हणी व त्यांचे अर्थ खालील प्रमाणे आहेत:
1) कुर्हाडीचा दांडा गोतास काळ: आपल्या जवळचा व्यक्ती आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो असा आहे.
2) चिंती परा येई घरा: दुसर्याबदल मनात वाईट विचार आले की स्वत:चेच वाईट होते.
3) टिटवी देखील समुद्र आटविते: सामान्य शुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.
4) खोट्याच्या कपाळी गोटा: वाईट कृत्य करणार्याला माणसाचे शेवटी वाईटच होते.
उपरोक्त दिलेल्या म्हणी व त्यांच्या अर्थानुसार 'टिटवी देखील समुद्र आटविते' ही म्हण 'सामान्य शुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.' हा अर्थ अचूक संबोधित करते.
म्हणी व वाक्प्रचार Question 10:
मोबदला न देता कामास जुंपणे ही भावना कोणत्या वाक्प्रचारातून व्यक्त होते?
Answer (Detailed Solution Below)
म्हणी व वाक्प्रचार Question 10 Detailed Solution
उत्तर - मोबदला न देता कामास जुंपणे ही भावना वेठीस धरणे या वाक्प्रचारातून व्यक्त होते.
वेठीस धरणे म्हणजे अडवून ठेवणे होय.
वाक्यात उपयोग - जमीनदार नेहमी शेतमजुरांना वेठीस धरण्याचे काम करत असत.
वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
Additional Information
- लक्ष वेधून घेणे म्हणजे एखाद्याचे मन वेधून घेणे होय.
- वाक्यात उपयोग - वक्त्याने आपल्या बोलण्याने सर्व श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले.
- शिकस्त देणे म्हणजे पराभव करणे होय.
- वाक्यात उपयोग - अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला शिकस्त दिली.
- प्रयत्नाची शिकस्त करणे म्हणजे आटोकाट प्रयत्न करणे होय.
- वाक्यात उपयोग - अविने धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली.
- शरपंजरी पडणे म्हणजे एखाद्या व्यक्तीची सर्व शक्ती आणि सामर्थ्य संपणे होय.
- वाक्यात उपयोग - अंगात घुसलेल्या बाणांमुळे भीष्म पितामह युद्धभूमीवर अक्षरशः शरपंजरीच पडले होते.